महाराष्ट्र शासनाचा अपंग सेवा पुरस्कार तसेच रोटरी क्लब ऑफ अमरावती द्वारा पुरस्कृत

दि डेफ अँड डम्ब रिलीफ असोसिएशन द्वारा संचालित

श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

साई नगर, अमरावती

(Reg. No. RCI0737/F570 Amravati)

Website www.dadraamt.in
Email dadraamravati@gmail.com
Phone 0721-2510997
प्रवेश प्रक्रिया सुरु...      इयत्ता ८ वी पर्यंत मोफत प्रवेश…

संस्थेचे उपक्रम

संस्थेच्या प्रगतीत मोलाचे सहकार्य

मुकबधीरांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाचे स्वप्न साकारण्या करीता रोटरी क्लब ऑफ अमरावती चे स्व. हंसराजभाई शाह व डॉ. रतनलालजी चांडक यांनी संस्थेची स्थापना १९७३ साली केली व श्री बुलिदान राठी ट्रस्ट, बनोसा यांच्या सहकार्यातून श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय सुरु करण्यात आले. यांच्या प्रयत्नाने विद्यालयाचे नाव रुपाला आले आणि ७ वी पर्यंत शाळा सुरु झाली.

स्व. छगनलालजी चुडीवाले यांनी संस्थेस १०,००० चौ. फुट भुखंड दान दिला. स्व. शंकरलालजी राठी, वालगांव यांनी शाळेच्या जुन्या इमारतीसाठी सहकार्य दिले. विद्यार्थ्यांकरीता १६ खोल्या बांधलेली अनंतवाडी येथील वास्तू डॉ. सत्यनारायण कासट आणि कासट परिवार यांनी स्व. हिरालालजी काराट यांच्या स्मृतीत संस्थेला अत्यल्प दरात दिली. स्व. डॉ. गणेशजी बूब यांच्या अध्यक्षते खाली १९९२ ते २०१९ या कालखंडात संस्थेने खूप प्रगती केली आणि त्याचीच प्रचिती म्हणजे आज बालवर्ग ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

श्री रंगनाथ श्री चांडक ट्रस्ट तर्फे स्व. कांतादेवी श्रीरंगजी चांडक स्मृती भवनाकरीता अनुदान मिळाले. नवीन सुसज्ज वास्तु, “पद्म-प्रकाश कोठारी सदन" च्या बांधकामासाठी श्री प्रकाशचंद्रजी कोठारी यांचे योगदान मिळाले व आय. एम. जाजोदिया डि. एड. कॉलेज करीता इंद्र कुमार मधुसुदन जाजोदिया फॅमिली ट्रस्ट यांच्या तर्फे योगदान मिळाले तसेच कक्ष बांधकामाकरीता स्व. शंकरलालजी लड्ढा, स्व. मदनलालजी खंडेलवाल, स्व. हरिप्रसादजी लड्ढा, स्व. लिलादेवी बूब, स्व. सायली गावपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी प्राप्त झाली. अॅड. आर. बी. अटल यांचे स्व. प्यारीबाई अटल अपंग कर्मशाळे करीता आर्थिक योगदान लाभले. राठी परिवार तिवसाजीन यांचे कडुन स्व. नवलकिशोर एवम् स्व. कांतादेवी राठी स्मृती रंगमंचा साठी आर्थिक योगदान मिळाले. भोजन कक्षा करिता पुरुषोत्तम मुंधडा व क्रीडा साहित्या करीता विशाल इ. राठी यांच्या कडून अनुदान मिळाले.

रोटरी क्लब ऑफ अमरावतीचे संस्थेला सदैव पाठबळ लाभले. विविध प्रकल्पासह पुनर्वसन, प्रशिक्षण केंद्रासाठी देखील रोटरी इंटरनॅशनल द्वारा मॅचींग ग्रॅन्ट मिळाली. सामाजीक न्याय मंत्रालय, महाराष्ट्र शासन, महानगर पालीका अमरावती, असंख्य दानदाते, आश्रयदाते सर्वांची संस्था आभारी आहे. आज डॉ. राजेश बुब यांच्या अध्यक्षतेखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

श्री अजय हेडा
सचिव